सिन्नर पोलिसांकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 07:19 PM2021-06-29T19:19:33+5:302021-06-29T19:20:15+5:30
सिन्नर: सिन्नरसह तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सिन्नर: सिन्नरसह तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सिन्नर शहर आणि तालुक्यात दुचाकी चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्याकडून दुचाकी चोरांचा छडा लावण्याच्या सूचना लॉकडाउन शिथील झाल्यानंतर सिन्नर पोलिसांना करण्यात आल्या होत्या.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांचे पथक तयार करण्यात आले होते. विविध गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी सदर पथकाकडून शोध सुरु होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्यातील पथकातील कर्मचारी गणेश परदेशी, विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड सिन्नर शहरातील सरदवाडी रोड येथे बायपास पुलाचे जवळ अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी सरदवाडी बाजूकडून सिन्नर बाजुकडे पॅशन मोटारसायकल एम एच १५ डीए ७९७८ याच्यावरील युवकास थांबवून त्याचेकडे सदरचे वाहनाच्या कागदपंत्राची चौकशी करण्यात आली. त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास सिन्नर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत सदर मोटारसायकल आॅक्टोबर २०२० मध्ये सरदवाडी रोड भागातील हॉटेल मिलनबारचे पाठीमागुन चोरी केल्याची त्याने कबुली दिली.
सदर गुन्हयात संशयित दिनेश विजय बागूल (१९) रा. मापारवाडी, सिन्नर यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून आणखी चौकशी केल्यानंतर त्याने चोरीच्या सात दुचाकी काढून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितास सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कागदपत्रे नंतर देतो सांगून विकत होता दुचाकी
संशयित आरोपी हा दुचाकी चोरल्यानंतर कागदपत्रे नंतर देतो असे सांगून दुचाकी विकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. विकलेल्या दुचाकी संशयिताने सिन्नर शहर, माळेगाव एमआयडीसी, पंचवटी, निमोण ता.संगमनेर, शिर्डी आदी परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.