सिन्नर पोलीस ठाण्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:14 PM2018-08-21T23:14:24+5:302018-08-22T00:25:22+5:30
दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे समाधानकारक प्रमाण, सामान्यांना पोलिसांकडून मिळणारी न्यायाची आणि सन्मानाची वागणूक, पोलीस ठाण्याची जनसामान्यांत असलेली दर्जेदार प्रतिमा यासह विविध सकारात्मक बाबींच्या बळावर सिन्नर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करीत आयएसओ मानांकन मिळविले. या उत्कृष्ट कामाबद्दल सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा गौरव करण्यात आला.
सिन्नर : दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे समाधानकारक प्रमाण, सामान्यांना पोलिसांकडून मिळणारी न्यायाची आणि सन्मानाची वागणूक, पोलीस ठाण्याची जनसामान्यांत असलेली दर्जेदार प्रतिमा यासह विविध सकारात्मक बाबींच्या बळावर सिन्नर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करीत आयएसओ मानांकन मिळविले. या उत्कृष्ट कामाबद्दल सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पालीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. यावेळी महसूलचे विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विभागीय पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड उपस्थित होते.
खासगी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे आॅडिट करून सिन्नर पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन बहाल करण्यात आले. पोलीस ठाण्याची
स्वच्छता, दप्तर लावण्याची पद्धत, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली प्रतिमा, पोलीस निरीक्षकांची नागरिकांसह आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी वागण्याची पद्धत आदी विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.