सिन्नरला शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:26 PM2018-10-09T17:26:58+5:302018-10-09T17:29:28+5:30

दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-या शेतक-यांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा सिन्नरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

 Sinnar protesters protest against farmers | सिन्नरला शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे निषेध

सिन्नरला शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे निषेध

Next

कृषीप्रधान भारत देशात अशा प्रकारे शेतक-यांची आंदोलने दडपण्याचे आणि ठोकशाही पध्दतीने शेतकºयांवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरु असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दिल्लीत शेतक-यांच्या मोर्चावर लाठीमार, अश्रूधूराचा वापर करून अनेक शेतक-यांना जखमी केले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शासनाकडून लोकशाही मार्गाने केली जाणारी आंदोलने दडपली जाणार असतील तर शेतक-यांनी न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न करत मनसेच्या वतीने या कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला. मनसेच्या पदाधिका-यांनी नायब तहसीलदार जाधव यांना निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष निखिल लहामगे, संतोष लोंढे, एकनाथ दिघे, संतोष गांजवे, भिवाजी शिंदे, धनंजय बोडके, सागर बेनके, स्वप्नील आव्हाड, गणेश सांगळे, श्रीकांत पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Sinnar protesters protest against farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.