सिन्नरला मूल्यवर्धन शिक्षणातील शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 04:25 PM2019-02-14T16:25:49+5:302019-02-14T16:26:11+5:30
सिन्नर : शांतिलालजी मुथा फाउण्डेशन व एससीआरटी पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने मूल्यवर्धन चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील ३२ शिक्षक व केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे होते.
सिन्नर : शांतिलालजी मुथा फाउण्डेशन व एससीआरटी पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने मूल्यवर्धन चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील ३२ शिक्षक व केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे होते.
येथील पंचायत समितीच्या गोपीनाथ मुंडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी उपसभापती जगन्नाथ भाबड, माजी सरपंच रामनाथ पावसे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ विस्तार अधिकारी डी.बी. पवार, राजीव लहामगे, शांतिलाल मुथाचे राज्य प्रोजेक्ट सदस्य कांचन भस्मे, जिल्हाप्रमुख नंदकिशोर साखला, तालुकाध्यक्ष डॉ. महावीर खिंवसरा, सौरभ खिंवसरा, मनोज भंडारी, सचिन भंडारी, तालुका समन्वयक भाऊसाहेब शेळके, बाळू फड, संदीप गिते यांच्या उपस्थिती हा सन्मान सोहळा पार पडला. मूल्यवर्धन रक्षणासाठी व मूल्यशिक्षणाची गरज तळागाळापर्यंत व प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील शाळेवर पोहचविणाºया विशेष शिक्षकांचा गौरव ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मत शिवनाथ निर्मळ यांनी व्यक्त केले. मूल्यवर्धन ही भविष्यकाळाची पायाभरणी असल्याचे सांगून समाजाची पायाभरणी करणारे आपण प्रेरक आहात ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगून उपक्र माचे कौतुक केले. किरण धोक्रट यानी सूत्रसंचालन केले, तर डॉ. महावीर खिंवसरा यांनी प्रास्ताविक केले.
चौकट - या शिक्षकांचा झाला गौरव
तात्यासाहेब गडाख, सुनीता खैरनार, राजेंद्र कोकाटे, गोरक्ष सोनवणे, भरत कापडणीस, शिवाजी जाधव, सचिन चव्हाण, भानुदास बेनके, पल्लवी गटकळ, पोपट कथले, मारुती आव्हाड, रवींद्र सातव, रामदास घुगे, इंद्रजित कराड, मीनाक्षी नागरे, संजय खरात, संगीता माहिरे, रवींद्र बैरागी, जयश्री वाघ, राजेंद्र पाटील, श्रीधर गीत, संदीप भोजने, सीता वळवी, अंबादास गायकवाड, सूर्यभान धाकराव, मंगल सांगळे, गंगाधर सानप, जयश्री गायकवाड, अश्विनी पाटील, अपर्णा पवार, एकनाथ मधे, कविता लोहार आदींना शिक्षण संचालकांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.