सिन्नरला एकाच दिवसात 32 रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 08:45 PM2020-08-04T20:45:54+5:302020-08-05T00:51:43+5:30
सिन्नर:शहरासह तालुक्यातील 32 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 10 तर ग्रामीण भागातील 7 असे एकुण 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून कोरोना बाधितांची संख्या 627 वर पोहचली आहे.
सिन्नर : शहरासह तालुक्यातील 32 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 10 तर ग्रामीण भागातील 7 असे एकुण 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून कोरोना बाधितांची संख्या 627 वर पोहचली आहे.
शहरातील लोंढे गल्लीत 53 व 32 वर्षीय पुरुष, अश्विनाथ नगरमध्ये 34 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, सरदवाडी रोडवर 57 वर्षीय पुरुष, जयभवानी रोडवर 70 वर्षीय पुरुष, संजीवनी नगरमध्ये 35 वर्षीय महिला, विजय नगरमध्ये 29 वर्षीय पुरुष, कानडी मळ्यात 70 वर्षीय महिला, वृंदावन नगरमध्ये 38 वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागातील गुळवंच येथे 5 रुग्ण आढळून आले असून त्यात 70 वर्षीय पुरुष व महिला, 65 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, डुबेरे येथे 89 वर्षीय महिला, दोडी बुद्रुक येथे 29 वर्षीय पुरुष असे तालुक्यात एकुण 17 रुग्णांची भर पडली आहे.
दरम्यान, सोमवारी (दि.3) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 8 रुग्णांची भर पडली होती. त्यात शहर व ग्रामीण प्रत्येकी 4 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील कमलनगर भागात 16 वर्षीय युवक, आश्विनाथ नगरमध्ये 32 वर्षीय पुरुष, संजीवनी नगरमध्ये 47 वर्षीय पुरुष तर कानडी मळ्यातील 38 वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागात पांढुर्ली येथे 33 वर्षीय पुरुष, लोणारवाडीत 19 वर्षीय युवक, मनेगाव येथे 27 वर्षीय तरुण व जायगाव येथे 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकुण 627 कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. मंगळवारी 32 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत 475 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.