सिन्नरला कापसाचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:58 IST2018-03-13T01:58:03+5:302018-03-13T01:58:03+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात सोमवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कापसाने भरलेला ट्रक उलटला. सुदैवाने घाटातील दरीच्या बाजूने लावण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कथड्याला ट्रक अडकला.

सिन्नरला कापसाचा ट्रक उलटला
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात सोमवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कापसाने भरलेला ट्रक उलटला. सुदैवाने घाटातील दरीच्या बाजूने लावण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कथड्याला ट्रक अडकला. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
शेवगाव येथून कापूस भरून ट्रक (एमएच १२ एनएक्स ७२५९) गुजरातच्या दिशेने निघाला होता. सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीव्र उतार असल्याने आणि ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. आणि ट्रक घाटातील लोखंडी संरक्षक कथड्यावर जाऊन आदळला.
या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अपघातामुळे लोखंडी संरक्षक जाळीचे नुकसान झाले आहे.