सिन्नर : स्वच्छता मित्रच्या दोन्ही गटात मुलींची बाजीवक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: December 10, 2015 11:32 PM2015-12-10T23:32:41+5:302015-12-10T23:40:14+5:30

सिन्नर : स्वच्छता मित्रच्या दोन्ही गटात मुलींची बाजीवक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sinnar: Spontaneous response to girls' livelihood competition in both groups of cleanliness friend | सिन्नर : स्वच्छता मित्रच्या दोन्ही गटात मुलींची बाजीवक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिन्नर : स्वच्छता मित्रच्या दोन्ही गटात मुलींची बाजीवक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सिन्नर पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील भिकुसा हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ व कनिष्ठ या दोन्ही गटात मुलींनी बाजी मारली.
गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मळ यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी एस. बी. कोठावदे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बी. के. बिन्नर, श्रीमती एस. के. चौधरी, एम. एम. शेळके, तालुका समन्वयक जी. बी. सरोदे, भिकुसा विद्यालयाच्या मुख्याध्यापक सरला डोंगरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
वरिष्ठ व कनिष्ठ गटात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सिन्नर महाविद्यालयासह दोडी बुद्रुक, देवपूर, नायगाव, शहा, वडांगळी, डुबेरे येथील महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. वरिष्ठ गटात सात, तर कनिष्ठ गटामध्ये १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून पी. डी. जाधव, व्ही. एल. सानप, एस. व्ही. कचरे व एस. व्ही. जाधव यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Sinnar: Spontaneous response to girls' livelihood competition in both groups of cleanliness friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.