सिन्नरला स्वयंस्फूर्तीने बाजारपेठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:58+5:302021-04-11T04:14:58+5:30
शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सक्रिय रुग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहर व ...
शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सक्रिय रुग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहर व तालुक्यातील सर्व दुकाने बाजारपेठा शुक्रवारी (दि. ९) रात्री आठपासून कडकडीत बंद करण्यात आली आहेत. या बंदमुळे सकाळपासून रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
शनिवारी शहरातील गणेशपेठ, सरस्वती पूल यांसह वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट होता. दवाखाने व औषध दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद होत्या. सकाळी दूध संकलन केंद्ो काही काळ उघडण्यात आली होती. प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने सिन्नर आगाराने बसफेऱ्या कमी केल्या होत्या.
तालुक्यातील ग्रामीण भागातही उत्स्फूर्तपणे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली. किराणा, भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होती. वावी, नांदूरशिंगोटे, वडांगळी, पांगरी, दोडी, ठाणगाव, पांढुर्ली, नायगाव, पाथरे, देवपूर, शिवडे या मोठ्या गावांसह सर्वच गावांतील व्यावसायिकांनी शासनाच्या नियमांचे पालन केले. दरम्यान, शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
फोटो - १० सिन्नर लॉकडाऊन
सिन्नर शहरात वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट दिसून येत होता.
===Photopath===
100421\10nsk_40_10042021_13.jpg
===Caption===
फोटो - १० सिन्नर लॉकडाऊन सिन्नर शहरात विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट दिसून येत होता.