सिन्नरला मनसेचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:13 AM2018-04-14T00:13:44+5:302018-04-14T00:13:44+5:30

सत्ताधारी नगरसेवकाला फोन करून पाणी कधी येणार, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचा राग येऊन त्याने उर्मट उत्तरे देण्यासह अरेरावी केल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

 Sinnar stays under MNS | सिन्नरला मनसेचा पालिकेत ठिय्या

सिन्नरला मनसेचा पालिकेत ठिय्या

googlenewsNext

सिन्नर : सत्ताधारी नगरसेवकाला फोन करून पाणी कधी येणार, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचा राग येऊन त्याने उर्मट उत्तरे देण्यासह अरेरावी केल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडत नगराध्यक्ष व मुख्याधि काऱ्यांना निवेदन दिले.  गुरुवारी सायंकाळी उपनगरातील एका नागरिकाने सत्ताधारी नगरसेवकास फोन करून पाणी कधी येणार आहे याची चौकशी केली असता सदर नगरसेवकाने उर्मट उत्तरे देण्यासह ‘तुला जर अडचण होत असेल तर तू गावात राहिला जा’, असा अजब सल्ला दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. जबाबदार नगरसेवकास असे उत्तर देणे शोभत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर प्रभागात त्या व्यक्तीची मालमत्ता आहे, ते सर्व प्रकारचे कर भरतात असे असताना नगरसेवक अरेरावी करून अशा प्रकारे उत्तरे देत असेल तर त्याचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मनसेचे शहराध्यक्ष संतोष लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष तुषार कपोते, उपतालुकाध्यक्ष शरद घुगे, निखिल लहमागे, समीर खतीब, संदीप मुत्रक, पांडुरंग माळी यांनी नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या दालनात ठिय्या दिला. त्यानंतर डगळे व मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांना या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशा मागणीचे निवेदन दिले.

Web Title:  Sinnar stays under MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे