सिन्नरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले सूर्यग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:55 PM2019-12-26T17:55:18+5:302019-12-26T17:55:47+5:30
सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात आज सर्व विद्यार्थ्यांनी दशकातले शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहणाचा सोलर गॉगल लावून आनंद लुटला व एका खगोलशास्त्रीय भौगोलिक अविष्कारचे साक्षीदार होण्याची संधी घेतली.
संस्थेचे सचिव राजेश गडाख यांनी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी नाशिक येथील विज्ञान प्रबोधिनी व संडे सायन्स स्कूलचे प्रणिती नेरकर व दीपक नेरकर यांच्या सहकार्यातून सोलर गॉगल्स उपलब्ध करून दिले होते. त्यातून मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विनायक काकुळते , बापू चतूर, जयश्री सोनजे, सुधाकर कोकाटे यांनी या सूर्यग्रहण दर्शनाचे नियोजन केले होते. सकाळी साडे आठ वाजेपासून तर साडे दहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात हे सूर्यग्रहण बघता येईल यासाठी नियोजन केले होते. विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण कसे होते त्यासाठी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या कक्षा कशा असतात ते केव्हा होते. त्यामागील खगोलशास्त्रीय , वैज्ञानिक व भौगोलिक कारणे कोणती असतात हे याप्रसंगी काकुळते, चतुर व सोनजे यांनी स्पष्ट करून सांगितले. विद्यार्थ्यांना हे सूर्यग्रहण सुरक्षितरित्या बघता यावे यासाठी सर्व वर्गशिक्षकांनी दक्षता घेत मार्गदर्शन केले.