सिन्नरला हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:15 AM2018-03-28T00:15:08+5:302018-03-28T00:15:08+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्तांची नियुक्ती यांसह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासने पाठिंबा दर्शविला आहे.
सिन्नर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्तांची नियुक्ती यांसह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदो लनास भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासने पाठिंबा दर्शविला आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे सोमनाथ आव्हाड, बाळा साहेब आव्हाड, पी. जी. आव्हाड यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. ेलोकपाल आणि लोकायुक्त कायद्यात बदल, शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्यांवर उपाय, निवडणूक पद्धतीमध्ये सुधारणा व्हावी या मागण्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास पाठिंबा म्हणून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले. निवेदनावर सहादू काकड, नवनाथ सांगळे, गोरक्षनाथ दराडे, किरण कांगणे, राजेंद्र सानप, राजाराम सांगळे, अशोक आव्हाड, पांडुरंग केदार, अजय सानप यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.