सिन्नरला वाळूतस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 06:42 PM2020-08-11T18:42:52+5:302020-08-11T18:44:08+5:30

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथे विनापरवाना सुमारे २११ ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी वाळूतस्करांवर महसूल विभागाच्या जिल्हा पथकाने कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी सबंधितांवर प्रतिब्रास ३० हजार रुपये याप्रमाणे ६३ लाख ३० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.

Sinnar takes action against sand smugglers | सिन्नरला वाळूतस्करांवर कारवाई

वडांगळी येथे महसूल विभागाने वाळूतस्करांवर केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर. 

Next
ठळक मुद्देअवैध उत्खनन : दोन ट्रॅक्टर जप्त

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथे विनापरवाना सुमारे २११ ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी वाळूतस्करांवर महसूल विभागाच्या जिल्हा पथकाने कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी सबंधितांवर प्रतिब्रास ३० हजार रुपये याप्रमाणे ६३ लाख ३० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
जिल्ह्याचे अनधिकृत गौणखनिज उत्खनन प्रतिबंधक पथक आणि सिन्नर तहसील कार्यालय यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नाशिकचे विशेष पथक, सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे, स्थानिक तलाठी व्ही. डी. कवाळे, सोमठाणेचे तलाठी गणेश कदम, कोतवाल संजय धरम यांच्या पथकाने वडांगळीत अचानक छापा टाकत वाळू उपसास्थळी आणि साठा केलेल्या ठिकाणी जात तेथून विनानंबरचे दोन ट्रॅक्टर जप्त केले. तसेच वाळू उपसास्थळाहून सुमारे २११ ब्रास वाळूचे अनधिकृत उत्खनन केल्याचा पंचनामा केला. दरम्यान, बाजारमूल्याच्या पाचपट दंड तसेच रॉयल्टी मिळून प्रतिब्रास ३० हजार रुपये याप्रमाणे संबंधितांना दंड ठोठावण्यात येणार आहे. याप्रकरणी वडांगळीचे तलाठी कवाळे यांच्याकडून संबंधित ट्रॅक्टरमालकांसह अन्य सहभागींवर मुसळगाव पोलिसांत विनापरवाना वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान यापूर्वी मे महिन्यातही तहसीलने केलेल्या कारवाईत येथील ११ वाळूतस्करांना सुमारे ३७ लाखांचा दंड ठोठावला होता.
 

Web Title: Sinnar takes action against sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.