सिन्नर : तहसीलदारांशी चर्चा सांगता
By admin | Published: April 19, 2017 11:14 PM2017-04-19T23:14:43+5:302017-04-19T23:16:13+5:30
सायंकाळी उपोषणाची सांगता करण्यात आली.
प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते लिंबू-पाणी देऊन या उपोषणाची सांगता करण्यात आली.सिन्नर : तहसीलदारांशी चर्चा सांगता सिन्नर : शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी व प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी सकाळपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी या उपोषणाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाध्यक्ष गोपाळ गायकर, सुनील जगताप, अर्जुन घोरपडे, कैलास दातीर, ज्ञानेश्वर कातकाडे, अजय कडाळे, राजकिरण नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा-जवळ आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.
सिन्नर तालुका दुष्काळी आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. उत्तर प्रदेशात कर्ज माफ केले जाते. मग महाराष्ट्रात कर्जमाफी का केली जात नाही, असा सवाल करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते.
तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना पाठविले होते. सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत शिंदे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे
आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले. शिवडे येथील शेतकरी प्रभाकर हारक, उत्तम हारक, बाळासाहेब पवार, सोमनाथ वाघ यांच्यासह शेतकऱ्यांची चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)