सिन्नर तालुक्यात एकाच दिवसात आढळले २५ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:38 PM2020-07-15T17:38:30+5:302020-07-15T17:38:47+5:30
सिन्नर: शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी शहर व तालुक्यात दुपारपर्यंत २५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २७० झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सिन्नर ग्रामीण रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या ५६ रुग्णांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यात ३१ अहवाल निगेटिव्ह असून २५ अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य यंत्रणनेने दिली. शहरातील ९ तर ग्रामीण भागातील १५ व ठाणे येथील एकाचा या २५ मध्ये सहभाग आहे.
शहरातील लोंढे गल्लीतील ५९ वर्षीय महिलेचा नाशिक येथे कोरोनावर उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील ४५ स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत. तर इंडियाबुल्स रुग्णालयात बुधवारी ३२ जणांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय यंत्रणेने दिली.