जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सिन्नर तालुका चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:29 PM2019-01-31T17:29:09+5:302019-01-31T17:30:34+5:30
सिन्नर तालुक्यातील मिरगाव, झापेवाडी, दापूर या शाळेने नवोपक्रम स्पर्धेचे नेतृत्व केले. लोकसहभागातून शाळांचा विकास या विषयावर नवोपक्रम स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेच्या निमित्ताने शिक्षण विभागाने छञपती शिवाजी स्टेडियम नाशिक येथे स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.
मिरगाव शाळेचा लोकसहभागातून झालेला कायापालट प्रायोगिक तत्वावर या नवोपक्र म स्पर्धेत मांडण्यात आला असून जवळपास ४ लाख रूपये खर्च करून लोकसहभागातून मोडकळीस आलेली शाळा नावारूपास आली आहे. तसेच दापूर शाळेचाही १ कोटी रूपयांच्या लोकसहभागातून उभी राहिलेली इमारत पीपीटीदवारे सादर करण्यात आली. तर ग्रामीण भागातील झापेवाडी शाळेचा गुणवत्ता विकास या नवोपक्रमात सादर करण्यात आला आहे. सदर नवोपक्र म मांडणीसाठी गोरक्ष सोनवणे, संदिप ओहोळ, राजु सानप, भानुदास बेनके या शिक्षकांनी सिन्नर गटाचे नेतृत्व केले आहे. नवोपक्रम स्पर्धा स्टॉलसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणे, राजीव म्हस्ककर, गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे, निफाड गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, डायटचे प्राचार्य सावंत, अधिव्याख्याता भगवान खारके, विस्तारअधिकारी प्रमोद चिंचोले, शितल कोठावदे, धनश्री कुवर, राजीव लहामगे, विजय कोळी, महेश जोशी आदींनी भेटी देऊन उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले आहे.