सिन्नर तालुक्यात २२ रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:15 PM2020-07-24T22:15:55+5:302020-07-25T01:12:30+5:30
सिन्नर : शहरासह तालुक्यात शुक्रवारी २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७४ झाली आहे. शासकीय व खासगी लॅबमार्फत आरोग्य विभागाला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ७ असे एकूण २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
सिन्नर : शहरासह तालुक्यात शुक्रवारी २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७४ झाली आहे.
शासकीय व खासगी लॅबमार्फत आरोग्य विभागाला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ७ असे एकूण २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
शहरातील साईदत्त नगरमधील महिला, मुलगी व मुलगा, रेणुकानगरमधील पुरुष, महिला, लोंढे गल्लीतील पुरुष, युवक, महिला, शिवाजीनगर येथील पुरुष, अशोका येथील पुरुष, खासगी लॅबमधील अहवालात ढोकेनगर येथील पुरुष, शेळके गल्लीतील पुरुष, वरंदळमळा रोड, शिवाजीनगर येथील पुरुष, कुंभार गल्लीतील पुरुष असे एकूण १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ग्रामीण भागात निमोण रोड येथील पुरुष, पास्तेरोड, हरसूलफाटा सोनांबे येथील पुरुष, कणकोरी येथील पुरुष, धोंडवीरनगर येथील पुरुष, वडगाव येथील पुरुष, माळेगाव येथील पुरुष व गुळवंच येथील पुरुष असे एकूण ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत ३२० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.