सिन्नर तालुक्यात एका दिवसात सर्वाधिक २९ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 08:32 PM2020-07-04T20:32:36+5:302020-07-04T23:15:57+5:30
सिन्नर : शहरासह तालुक्यात शनिवारी एका दिवसात सर्वाधिक २९ कोरोना बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या १७४ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहरासह तालुक्यात शनिवारी एका दिवसात सर्वाधिक २९ कोरोना बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या १७४ वर पोहचली आहे.
शिवडे येथे ७, चास येथे ५, दोडी बुद्रुक येथे ४, पाटपिंप्री येथे ३ तर वडगाव- पिंगळा, मºहळ बुद्रुक, पांढुर्ली, विंचूर दळवी येथे प्रत्येकी १ रु ग्ण आढळून आला आहे. शिवडे येथे १५ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय तरु ण, १९, २१ व २३ वर्षीय तरुणी, ४५ वर्षीय महिला व ५१ वर्षीय पुरु ष, चास येथे ३१, २७, ५० व ६२ वर्षीय पुरु ष, ४७ वर्षीय महिला, दोडी बु॥ येथे २९ वर्षीय महिला, ५ व १ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय पुरुष, पाटपिंप्री येथे ३ वर्षीय मुलगा, १९ वर्षीय तरु णी, ८५ वर्षीय महिला, वडगाव-पिंगळा येथे ७२ वर्षीय महिला, मºहळ बु॥ येथे ४३ वर्षीय पुरु ष व पांढुर्ली येथे ४५ वर्षीय पुरु षाचा अहवाल पॉझििटव्ह आला आहे. आत्तापर्यंत ८९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
ओझरला एकाच कुटुंबातील सहा बाधित
ओझर : येथे शुक्र वारी ७७ वर्षीय पुरुषाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती.त्यानंतर एकूण ११ जणांना क्वारंटईन करण्यात आले होते.त्यापैकी शनिवारी त्यातील सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझििटव्ह आले आहेत. त्यात एक पुरु ष पाच महिलांचा समावेश आहे. त्यामुळे ओझरच्या कोरोना अॅक्टिव्ह पेशंटची संख्या एकूण आठ झाली आहे. दरम्यान ज्या परिवारात सात पेशंट निघाले त्यांच्या घरी पिंपळगाव येथे आठ दिवसांपूर्वी लग्न होते.त्याच लग्नात सदर कोरोना कनेक्शन समजले जाते. त्यामूळे चाळीशीच्या वर बाधित सापडलेल्या पिंपळगावचे कनेक्शन आता सर्वत्र चर्चिले जाऊ लागले आहेत.
पेठला सात जण बाधीत
पेठ : शहरात नगरपंचायत क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या सात झाली असून त्यात तीन महिला व चार पुरु षांचा समावेश आहे. शुक्र वारी बाधीत रूग्णांच्या संपर्कातील २० जणांचे घशाचे नमूने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोतीलाल पाटील यांनी दिली. नगरपंचायत क्षेत्रातील बलसाड रोडवरील एका व्यापाऱ्याचा रिपोर्ट पॉझििटव्ह आल्यानंतर त्याच घरात घरकाम करणाºया महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या व आधीच्या बाधीत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २० जणांना बोर्डींगपाडा येथील कोरोना कक्षात ठेवण्यात आले असून सर्वांचे घशाचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
येवला येथे एक पॉझिटीव्ह
येवला : शहरातील मोमीनपुरा भागातील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटीव्ह आला आहे. तर पाच बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. १५ संशयित रूग्णांचे स्वॅब आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले असून नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथून पाच बाधित कोरोनामुक्त होवून शनिवारी घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रु ग्ण संख्या १६७ झाली असून आतापर्यंत १०७ बाधित कोरनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील कोरोना बळींची
संख्या ११ झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.