सिन्नर तालुक्यात वादळ, पावसाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:19+5:302021-06-02T04:12:19+5:30

सिन्‍नर : तालुक्यातील शनिवार व रविवार या दोन दिवसांत वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्याचा आठ गावांना तडाखा बसला ...

In Sinnar taluka, panchnama of storm and rain damage has been completed | सिन्नर तालुक्यात वादळ, पावसाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण

सिन्नर तालुक्यात वादळ, पावसाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण

Next

सिन्‍नर : तालुक्यातील शनिवार व रविवार या दोन दिवसांत वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्याचा आठ गावांना तडाखा बसला आहे. यात बहुतांश घरांचे पत्रे उडाल्याने तर काही घरांच्या भिंती खचल्याने नुकसान झाले आहे. वादळाचा सर्वाधिक तडाखा दापूर व देशवंडी या दोन गावांना बसला आहे. शासन स्तरावर तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.

तलाठी, कृषी सहायक यांनी घटनास्थळी दाखल होऊन नुकसानाची पाहणी करीत तत्काळ पंचनामे केले. पंचनाम्यांचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करण्यात आला असून, तत्काळ वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार आहे. वादळ व पावसात वीज कोसळून सायाळे येथे दोन जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर दातली येथे वीज पडून रवींद्र विठोबा जाधव यांची गाय मृत झाली.

घराची पत्रे उडाली व नुकसान : कारभारी रंगनाथ शेळके (दातली), विमल बबन सदगीर (मोहदरी), कमल संपत कांगणे, रामचंद्र दादा गोफणे (दोघे खंबाळे), पांडुरंग शंकर लांडगे (वडगाव पिंगळा), मधुकर रामचंद्र बर्के, काशिनाथ रामचंद्र बर्के, ज्ञानेश्‍वर डोमाडे, हेमंत ज्ञानेश्‍वर डोमाडे, तुकाराम ज्ञानेश्‍वर डोमाडे, मधुकर भानु घुगे, भगवान तुकाराम बर्गे, दत्तात्रय बाळकृष्ण घुगे, रामकृष्ण दामू बर्के, जगन वाळीबा डोमाडे, सुदाम रामभाऊ कापसे (सर्व. देशवंडी), पुंडलिक नागू काकड (जायगाव), विश्‍वनाथ शंकर आव्हाड, दत्तात्रय निवृत्ती आव्हाड, पांडुरंग दादा मोरे, दत्तू कारभारी मोरे, नंदू सुकदेव मोरे, भाऊसाहेब किसन आव्हाड, खैदुद्दीन कंकरभाई आव्हाड, सुरेश सखाराम वेताळे, काशिनाथ शंकर आव्हाड, अर्चना संतोष आव्हाड, वत्सला गोपीनाथ गीते, नुरजहाँ हुसेन अन्सारी (सर्व दापूर).

शाळेच्या खोलीची पत्रे उडाली : जि. प. शाळा बिरोबावाडी (खंबाळे), कांदाचाळीची पत्रे उडाली : दादा काशिनाथ सानप (वडगाव पिंगळा), पोल्ट्रीशेडची पत्रे उडाली : सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (दोडी बुद्रुक), वॉलकम्पाउंडचे नुकसान : पंढरीनाथ जयराम कापडी (देशवंडी) आदींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वादळात आशाबाई काशिनाथ बर्के (३६), तुकाराम ज्ञानेश्वर डोमाडे (२३), अलका ज्ञानेश्‍वर डोमाडे (४२) (सर्व देशवंडी) किरकोळ जखमी झाले आहेत.

चौकट

दापूर परिसरात उदय सांगळे यांच्याकडून पाहणी

दापूर गाव परिसरात घराच्या पडझडीचे, पत्रे उडाल्याचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह २७ रहिवाशांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेनेचे उदय सांगळे यांनी तत्काळ दखल घेऊन नुकसानाची पाहणी केली. कांदाचाळीची पत्रे उडाल्याने काही ठिकाणी कांदा भिजला आहे. पत्रे उडाल्याने काही रहिवाश्यांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून, शासन स्तरावरून भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उदय सांगळे यांनी सांगितले. यावेळी पोलीस पाटील ज्ञानेश्‍वर साबळे, तलाठी परदेशी, कृषी सहायक श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: In Sinnar taluka, panchnama of storm and rain damage has been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.