सिन्नरला विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:35 PM2020-05-08T22:35:07+5:302020-05-09T00:07:39+5:30
सिन्नर : सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सिन्नर येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ट्रेडनुसार प्रथम व द्वितीय वर्ष असे ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना घरी बसून आॅनलाइन प्रशिक्षण देणे सुरू केले असून, त्यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

राज्यभरातील आयटीआयमध्ये लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे नियमित प्रशिक्षण बंद आहे. यावर मात करून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर यांनी वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाइन प्रशिक्षण देण्याची सोय करून दिली आहे.
भारत स्किल व्हिडीओ, तसेच यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते, ट्रेडनुसार पाठ संपल्यावर त्या पाठवरील प्रश्नसंच विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जात आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा ग्रुपच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिवराज सोनवणे घेतात. संस्थेचे निदेशक दिनेश पवार, दुर्गेश कदम, किरण हिरे, विक्रम टेमगर, रुपाली गोडसे, अंजली मावलकर व लिपिक वनिता बैरागी यांच्या नियोजनबद्ध कामामुळे खूप मोठे यश मिळालेले आहे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे, फक्त विनोद व गुड मॉर्निंगसारख्या मेसेजसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपसारख्या या समाज माध्यमाचा शैक्षणिक कार्यासाठी अशाही पद्धतीने आपण उपयोग करू शकतो, हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने दाखवून दिले आहे.