सिन्नरला रोटरी क्लबतर्फे दिव्यांगांना खुर्ची वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:27+5:302021-08-27T04:18:27+5:30
येथील अश्विनाथ बाबा चौकातील अनिल सरवार मित्रपरिवार संपर्क कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. सतीश नेहे यांनी सरवार ...
येथील अश्विनाथ बाबा चौकातील अनिल सरवार मित्रपरिवार संपर्क कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. सतीश नेहे यांनी सरवार यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाला होणारा अवास्तव खर्च टाळून हा सामाजिक उपक्रम राबविला.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे, कार्याध्यक्ष नंदू शिरसाट, गोंदेश्वर रोटरीचे सेक्रेटरी किरण वाघ, माजी अध्यक्ष सुभाष परदेशी, महेश बोऱ्हाडे, सदस्य सतीश नेहे, सुरेश जोंधळे, विनोद दंताल, कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार, लिग्रा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण बर्गे, कामगार शक्ती फाउंडेशनचे सचिव रवींद्र गिरी, नवनाथ दांगट, आनंदा आव्हाड, अविनाश आव्हाड, निखिल उगले, सूरज घेगडमल तसेच कामगार शक्ती फाउंडेशन व रोटरी क्लब गोंदेश्वरचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव व सभासद उपस्थित होते.
कोट...
कोविडच्या काळात बऱ्याच लोकांनी अन्नधान्य वाटप केले. ही बाब कौतुकाचीच आहे. पण दिव्यांगांना तीनचाकी सायकल, खुर्ची, व्हीलचेअर अशा वस्तूंचीदेखील गरज आहे. यामुळे त्यांची ऊठबस सोयीस्कर होते. त्यासाठी हा उपक्रम राबविला.
- सतीश नेहे, सदस्य, रोटरी क्लब गोंदेश्वर, सिन्नर
कामगार शक्ती फाउंडेशन व रोटरी क्लब गोंदेश्वर यांनी राबविलेला उपक्रम कायम मनात घर करून राहील. समाजात आमची काळजी घेणारे लोक आहेत हा विश्वास यानिमित्ताने दुणावला आहे.
-अरुण पाचोरे, तालुकाध्यक्ष, प्रहार दिव्यांग संघटना
फोटो - २६ सिन्नर चेअर
सिन्नर येथे दिव्यांग बांधवांना खुर्च्या वाटप करण्यात आल्या. यावेळी अरुण पाचोरे, नंदू शिरसाट, किरण वाघ, सुभाष परदेशी आदी.
260821\26nsk_9_26082021_13.jpg
सिन्नर येथे दिव्यांग बांधवांना खुर्च्या वाटप करण्यात आल्या. यावेळी अरुण पाचोरे, नंदु शिरसाट, किरण वाघ, सुभाष परदेशी आदी.