सिन्नरला पाच बसेसमधून ११० परप्रांतीय गावाकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:21 PM2020-05-13T21:21:11+5:302020-05-14T00:46:14+5:30
सिन्नर : लॉकडाऊनमुळे सिन्नरमध्ये अडकून पडलेल्या ११० परप्रांतीय कामगारांना सिन्नर बसस्थानकातून पाच बसद्वारे त्यांच्या राज्याकडे मार्गस्थ करण्यात आले.
सिन्नर : लॉकडाऊनमुळे सिन्नरमध्ये अडकून पडलेल्या ११० परप्रांतीय कामगारांना सिन्नर बसस्थानकातून पाच बसद्वारे त्यांच्या राज्याकडे मार्गस्थ करण्यात आले.
तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. रसेडे, विजय माळी, आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वाहतूक नियंत्रक प्रमोद घोलप आदींच्या उपस्थितीत या बसेस रवाना झाल्या. लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभर मुसळगाव, माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद ठेवण्यात आल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यातील ११० कामगारांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत जाता यावे यासाठी महसूल प्रशासनाने व्यवस्था केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन बसेस मध्यप्रदेशातील सेंधवा या गावी तर एक बस विजापूरकडे रवाना करण्यात आली. नोंदणी होऊन त्याप्रमाणे परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे. कामगारांना गाडीत बसण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बच्छाव यांनी सांगितले.
----------------
१२०० कामगारांची रेल्वेने व्यवस्था
माळेगाव औद्योगिक वसाहत परिसरातील सुमारे १२०० परप्रांतीय मजुरांना आपापल्या मूळगावी पाठविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ज्यांना ज्यांना गावाकडे परतायचे आहे अशा कामगार, मजुरांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात येत होती. नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा वाघ यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामगारांची आरोग्य तपासणी केली. सर्व कामगारांची आरोग्य तापसणी झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र बसने नाशिकरोड येथे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात येईल. तेथून विशेष रेल्वेने सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.