सिन्नरला दोन टप्प्यात २८०० जणांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 08:07 PM2021-03-05T20:07:15+5:302021-03-06T00:38:34+5:30

सिन्नर : सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दोन टप्प्यात २८०० जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले आहे तर मंगळवारपासून (दि. २) कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५० ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली. विशेष म्हणजे लस टोचून घेतलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.

Sinnar was vaccinated by 2800 people in two phases | सिन्नरला दोन टप्प्यात २८०० जणांनी घेतली कोरोना लस

सिन्नरला दोन टप्प्यात २८०० जणांनी घेतली कोरोना लस

Next
ठळक मुद्दे लसीकरण: दुसऱ्या टप्यात २५० ज्येष्ठांचा सहभाग

वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, नोडल अधिकारी डॉ. वैभव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरण अधिकारी संगीता शिंदे, जयश्री लांडगे, अमोल ह्याळीज, वॅक्सिनेटर दीपाली केदार यांनी नागरिकांना लस दिली. कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे २५५० कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, प्रशासन व इतर कोरोना योद्ध्यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सामान्य व्यक्तींनाही कोरोना लस घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना को-विन या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन किंवा वेबसाईटवर नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अ‍ॅप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा येत आहे. मात्र नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासगी सेंटर सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून खासगी दवाखान्यातही लसीकरण सुरू होऊ शकते. तसे झाल्यास सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल. २५ जानेवारीपासून कोरोना योद्ध्यांसह ज्येष्ठ व व्याधीग्रस्त अशा जवळपास २८०० नागरिकांनी लस टोचून घेतल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.

Web Title: Sinnar was vaccinated by 2800 people in two phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.