सिन्नरला कोरोना योध्दा पोलिसांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:09 PM2020-07-04T17:09:15+5:302020-07-04T17:10:31+5:30
सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वप्रथम हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या सिन्नर पालीस ठाण्यातील पोलिस कर्मचायांचे तेथील कर्तव्य पूर्ण करत १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर सिन्नरला आगमन झाले. सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने या तीन कर्मचायांची रथातून मिरवणुक काढून जंगी स्वागत करण्यात आले.

सिन्नर पोलिस ठाण्यातून पाच पोलिस मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. या कालावधीत दोघा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी एक कर्मचारी कोरोनावर विजय मिळवून घरी परतला तर दुसऱ्या कर्मचायांवर उपचार सुरु आहेत.
त्यानंतर या कर्मचायांना जिल्हा मुख्यालयात १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. कालावधी पूर्ण करून परतलेल्या तीन पोलीसांची मिरवणूक व त्यानंतर त्यांचे औक्षण करु न फेटे बांधण्यात आले, व सत्कार करण्यात आला.