सिन्नरला लाचेची मागणी करणारा व्यवस्थापक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:56 AM2018-12-04T00:56:16+5:302018-12-04T00:56:31+5:30
सिन्नर : फटाक्याच्या स्टॉलसाठी बांधलेल्या गाळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा मिळावा, याासाठी लाच मागितल्याप्रकरणी नगर परिषदेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची डिजिटल व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संशयिताविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार यांचा मंडप व लाइट डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांना फटाके स्टॉलसाठी तात्पुरत्या बांधलेल्या ४२ गाळ्यांना विद्युत पुरवठा मिळण्यासाठी नगरपरिषदेचा ना हरकत दाखल्याची आवश्यकता होती. त्यांनी सिन्नर नगर परिषद येथे अर्ज केला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने तक्रारदार सिन्नर नगर परिषदेचे सहायक मिळकत व्यवस्थापक नीलेश मोतीराम बाविस्कर यांना नगर परिषद कार्यालयात भेटले होते. त्यांनी तक्रारदार यांना ना हरकत दाखला देण्याकरिता ४२ गाळ्यांचे प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार २०० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली. ( पान ५ वर)
ही तक्रार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकहे प्राप्त झाली होती.
तक्रारदार यांचे तकारीवरुन ३० आॅक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाचे सापळापूर्ण पडताळणी केली होती. त्यात संशयित नीलेश बाविस्कर यांनी ना हरकत दाखला देण्याकरीता तक्र ारदार यांचेकडे ४ हजार २०० रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संशयित बावीस्कर यांच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ (सुधारीत सन २०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, बावीस्कर यांना ताब्यात घेण्यात आले असून सायंकाळी उशीरा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.