सिन्नरला नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 09:39 PM2020-06-25T21:39:19+5:302020-06-25T21:39:48+5:30
सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयात पथक सिन्नर शहर व तालुक्यात तपासणी करणार असून, कोविड-१९ संदर्भात जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाºया दुकाने, खासगी आस्थापनेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी, तलाठी यांचा या पथकात समावेश असून, आपापल्या कार्यक्षेत्रात ही पथके प्रांताधिकारी यांच्या आदेशाने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांवर देखरेख ठेवणार आहे. या पथकाने मंगळवारी (दि. २३) सिन्नर शहरात विविध भागात तपासणी केली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा अभाव, मास्क न वापरता ग्राहकांना सेवा देणे, नियमापेक्षा अधिक कर्मचारी, दुकानातील अनियंत्रित गर्दी याबाबत काही दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत.
दरम्यान, हे भरारी पथक तालुक्यात तपासणी करून नियमांचे उल्लंघन करताना दिसून आल्यास दुकाने सील करण्याची कारवाई करणार आहे. पार्सल सेवेच्या नावाखाली सुरू केलेल्या हॉटेल्सची-देखील पथकाने तपासणी केली असता तिथेदेखील शासन निर्देशांचे पालन होत नसल्याचे आढळून आले, मात्र पहिल्या खेपेला लेखी समज देण्यात येत असून, दुसºया वेळी मात्र थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पथकाचे प्रमुख मरकड यांनी सांगितले. नगरपालिकेतर्फे दुकानदारांना नोटिसागणेशपेठ या गजबजलेल्या भागात असणाºया दुकानांची तलाठी आकाश हांडे यांच्या समवेत या पथकाने तपासणी केली असता दुकानात खरेदीसाठी अधिक गर्दी आढळून आली. याबाबत काही दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या. यात बहुतांश कापड दुकानांचा समावेश आहे. पुन्हा हीच परिस्थिती आढळल्यास दुकान सील केले जाईल, असे या नोटिसीत म्हटले आहे. मुख्याधिकाºयांनी संबंधित दुकानांची दररोज तपासणी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यास कायदेशीर फिर्याद दाखल करावी, असे निर्देशदेखील विशेष भरारी पथकाकडून देण्यात आले आहेत.