सिन्नरला पेट्रोल पंपावर पेटली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:43 AM2018-12-06T00:43:56+5:302018-12-06T00:45:32+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कृषी बाजार समितीने इंडियन आॅइल कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या पेट्रोलपंपावर सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अचानक ओम्नी कारने पेट घेतला. पंपावरील कर्मचाºयांनी जीव धोक्यात घालून प्रसंगावधान राखत गाडी पंपाबाहेर ढकलत नेण्याचे धाडस केल्याने मोठा अनर्थ टळला.

बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास ओम्नी पेट्रोल भरण्यासाठी पंपाच्या आवारात आली. त्यावेळी ओम्नीमधून धूर बाहेर येऊ लागला व अचानक कारने पेट घेतला. सुदैवाने चालक बाहेर पडला. कर्मचाºयांनी गाडीकडे धाव घेऊन आगप्रतिबंधक बाटलीच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, तर काही कर्मचाºयांनी गाडी ढकलत पंपाच्या आवाराबाहेर काढली. कार सिन्नर-शिर्डी महामार्गापर्यंत बाहेर ढकलत नेल्याने आगेने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशामक दलाच्या बंबाला फोन करण्यात आला. त्याचवेळी पाण्याचा खासगी टॅँकर रस्त्याने जात होता. त्यास थांबवून कारची आग विझविण्यात आली. यात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र चालक कोण होता हे समजू शकले नाही.
कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून जीव धोक्यात घालून कार पेट्रोल पंपाच्या बाहेर ढकलत नेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रात्री उशीरापर्यंत कार कोणाच्या मालकीची होती ते समजू शकले नाही.