सिन्नरला नगरसेविकेचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:05+5:302021-04-01T04:15:05+5:30

प्रभाग क्र. १२ मधील काही भागात लोकांच्या सोयी-सुविधांसाठी अत्यंत आवश्यक कामांची अंदाजपत्रके व तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. या ...

Sinnarla corporal symbolic fast | सिन्नरला नगरसेविकेचे लाक्षणिक उपोषण

सिन्नरला नगरसेविकेचे लाक्षणिक उपोषण

googlenewsNext

प्रभाग क्र. १२ मधील काही भागात लोकांच्या सोयी-सुविधांसाठी अत्यंत आवश्यक कामांची अंदाजपत्रके व तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. या भागातील कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. हा भाग गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून विकासकामांपासून वंचित असून, जनतेची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मागील चार वर्षांपासून वरंदळ यांनी स्वत: प्रभागातील नागरिकांसह नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे तसेच मुख्याधिकारी संजय केदार यांच्याकडे वारंवार तोंडी आणि लेखी पाठपुरावा करूनही या कामांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले असल्याचे वरंदळ यांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, नगरसेवक नामदेव लोंढे, रामभाऊ लोणारे, मल्लू पाबळे, संतोष शिंदे, शीतल कानडी, मालती भोळे, प्रीती वायचळे, हरिभाऊ वरंदळ, अनिल वराडे यांच्यासह सिद्धिविनायक हॉस्पिटल परिसर, हेरंब संकुल परिसर, दत्त मंदिर परिसर, जयमल्हार कॉलनी यांच्यासह प्रभागातील रहिवासी नियमांचे पालन करून उपस्थित होते.

इन्फो...

पंधरा दिवसांत प्रश्न मार्गी लावणार

नगराध्यक्ष किरण डगळे, उपमुख्याधिकारी रोहित पगार व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रलंबित कामांबाबत जाब विचारण्यात आला. प्रभागातील दुर्लक्षित विकासकामांबाबत ठोस उपाययोजना व विकासकामांच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष डगळे यांनी दिले. संबंधित अधिकारी वर्गाकडून पुढील १५ दिवसांमध्ये प्रभागातील विविध कामांचे इस्टिमेट तयार करून त्यास तांत्रिक मंजुरी घेण्यात येईल. या प्रस्तावांना निधी उपलब्ध करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविणार असल्याचे डगळे यांनी सांगितले.

फोटो ओळी- ३१सिन्नर ४

सिन्नर नगर परिषेदच्या पायऱ्यांवर उपोषणादरम्यान नगराध्यक्ष किरण डगळे यांना मागण्यांचे निवेदन देताना नगरसेविक गीता वरंदळ. त्यांच्यासमवेत रामभाऊ लोणारे, संतोष शिंदे, हरिभाऊ वरंदळ, अनिल वराडे, आदी.

===Photopath===

310321\31nsk_35_31032021_13.jpg

===Caption===

सिन्नर नगरपरिषेदच्या पायऱ्यांवर उपोषणादरम्यान नगराध्यक्ष किरण डगळे यांना मागण्यांचे निवेदन देतांना नगरसेवक गीता वरंदळ. समवेत रामभाऊ लोणारे, संतोष शिंदे, हरिभाऊ वरंदळ, अनिल वराडे आदि.

Web Title: Sinnarla corporal symbolic fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.