सिन्नरला डीसीएचसी सेंटर लवकरच कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:10 PM2020-05-03T21:10:33+5:302020-05-03T21:14:09+5:30

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या आठवडाभरात सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर (डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर) कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमाने सौम्य व मध्यम आजार असलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान व त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. आमदार माणिकराव कोकाटे यांनी रुग्णालयाची पाहणी करून आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याची सूचना केली़

Sinnarla DCHC Center soon operational | सिन्नरला डीसीएचसी सेंटर लवकरच कार्यान्वित

सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असून, रुग्णालयाची पाहणी करताना आमदार माणिकराव कोकाटे.

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालय : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी आरोग्य विभाग सजग


लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या आठवडाभरात सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर (डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर) कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमाने सौम्य व मध्यम आजार असलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान व त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. आमदार माणिकराव कोकाटे यांनी रुग्णालयाची पाहणी करून आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याची सूचना केली़
नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्यासह अधिकाऱ्यांनी औषधसाठा, फर्निचर, बेडसीट, पाण्याची व्यवस्था, कॉम्प्युटर, प्रिंटर, वेटिंग चेअर आदींची गरज असल्याचे आमदार कोकाटे यांना सांगितले.
सॅण्डोज या कंपनीने सीएसआर फंडातून ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचे साहित्य पुरविले आहे.
त्यात एक्स रे मशीन, ३० खाटा, गाद्या, उशा, शस्रक्रिया विभागासाठी आवश्यक साहित्य, सर्जिकल
साधने, डेंटल चेअर आदींचा त्यात समावेश आहे. तथापि, कोरोनामुळे केवळ खाटा प्रत्येक वॉर्डात लावण्यात आल्या असून,
अन्य साहित्याची सध्या आवश्यकता नसल्याने स्टोअर रूममध्ये
ठेवण्यात आले असल्याची माहिती डॉ. खैरनार यांनी दिली.
तथापि, येत्या चार-पाच दिवसात आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही कोकाटे यांनी दिली.
३० खाटांच्या रुग्णालयाची पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयाच्या स्वच्छतेसह अन्य सूचनादेखील केल्या. डॉक्टर, आरोग्यसेवकांसह २८ जणांची नेमणूककोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्यसेविका अशा २८ जणांची शासनाने या सेंटरसाठी तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक केली असल्याची माहिती डॉ. खैरनार यांनी दिली.
कोरोना संकट मिटल्यानंतर संबंधित आपापल्या कार्यक्षेत्रात परततील. संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी लॅब टेक्निशियन मिळालानंतर स्वॅब नाशिक येथे मविप्र रुग्णालयाच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतील, असेही ते म्हणाले.डीसीएचसी सेंटर सुरू करण्यासाठी येणाºया अडचणी तातडीने कळविण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाºयांना करण्यात आल्या आहेत. लॅब टेक्निशियन देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी चर्चा केली असून, सेंटर तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- माणिकराव कोकाटे, आमदार

Web Title: Sinnarla DCHC Center soon operational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.