सिन्नरच्या पाणीप्रश्नी महिला संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 05:20 PM2020-01-27T17:20:05+5:302020-01-27T17:20:39+5:30

सिन्नर : शहर व उपनगरांचा पाणीपुरवठा करताना दुजाभाव केला जातो का याची चौकशी करण्यासह पाणी सोडण्याची वेळ, किती वेळ सोडले जाते व महिन्यातून किती दिवस पाणीपुरवठा केला जातो याचे आॅडीट करण्याची मागणी शहरातील विजयनगर व कानडी मळ्यातील नगरसेवकांसह महिलांनी केली आहे.

 Sinnar's angry women question |  सिन्नरच्या पाणीप्रश्नी महिला संतप्त

 सिन्नरच्या पाणीप्रश्नी महिला संतप्त

Next

विजयनगर भागातील नगरसेवक संतोष शिंदे व कानडीमळा परिसरातील नगरसेवक शीतल कानडी यांच्यासह परिसरातील संतप्त महिलांनी उपमुख्याधिकारी रोहित पगार यांची भेट घेऊन पाणीटंचाईच्या समस्येबाबत गाºहाणे मांडले व उपाययोजना करण्यासाठी मागणी केली. या भागातील पाणीप्रश्न न सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. विजयनगर व कानडी मळा परिसरात पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या भागात महिन्यातून किती वेळेस पाणी येते व किती वेळ येते हे तपासण्यासह पाण्याच्या वेळेत सातत्य आहे की नाही हे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. शहर व उपनगरांचा पाणीपुरवठा करतांना दुजाभाव होतो का याची पाहणी करण्याची मागणीही मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. पाण्याचे योग्य नियोजन करावे म्हणजे जनतेच्या रोषाला नगरसेवक व नगरपरिषद प्रशासनाला जावे लागणार नाही असे शिंदे व कानडी यांनी सांगितले. उपमुख्याधिकारी रोहित पगार यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विजयनगर व कानडीमळा भागातील महिला उपस्थित होत्या.

Web Title:  Sinnar's angry women question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.