सिन्नरला दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:25+5:302021-03-04T04:24:25+5:30
------------------------ धोंडबारच्या सरपंचपदी वंदना कवटे सिन्नर : तालुक्यातील धोंडबार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना आत्माराम कवटे यांची, तर उपसरपंचपदी प्रकाश निवृत्ती ...
------------------------
धोंडबारच्या सरपंचपदी वंदना कवटे
सिन्नर : तालुक्यातील धोंडबार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना आत्माराम कवटे यांची, तर उपसरपंचपदी प्रकाश निवृत्ती खेताडे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच कवटे यांचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------
पांढुर्ली विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
सिन्नर : तालुक्यातील मविप्र संचलित पांढुर्ली येथील जनता विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञान समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व्ही. पी. उकिरडे, पर्यवेक्षक व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
------------------
विभागीय नियंत्रकांकडून बसस्थानकाची पाहणी
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील यांनी सिन्नर बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र जाजू यांच्या एस. के. जाजू स्टॉलवर भेट देऊन कोरोनाच्या काळातही वृत्तपत्र सेवा अविरतपणे चालविल्याबद्दल त्यांनी जाजू यांचे कौतुक केले.