सिन्नरला दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:14 AM2021-03-23T04:14:55+5:302021-03-23T04:14:55+5:30
--------------------- सिन्नर तालुक्यात पिकांचे नुकसान सिन्नर : तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात अवकाळी ...
---------------------
सिन्नर तालुक्यात पिकांचे नुकसान
सिन्नर : तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात अवकाळी पावसाने भाजीपाला, गहू, हरभरा या पिकांसह डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
---------------------
चिंचोली शाळेला संगणक भेट
सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अॅव्हलॉन कॉस्मेटिक कारखान्याकडून सात संगणक संच भेट देण्यात आले. मुख्य व्यवस्थापक अश्विनी अग्रवाल, कैलास वाजे, समीर इनामदार, संजय सानप, दत्ता नवाळे आदींच्या हस्ते मुख्याध्यापक संपदा बैरागी यांच्याकडे संगणक सुपूर्द केले.
---------------
घोरवड घाटात घाणीचे साम्राज्य
सिन्नर : सिन्नर - घोटी महामार्गावरील घोरवड घाटात प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे घाटातून ये - जा करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाटात कचरा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
---------------------
डुबेरेत आरोग्य तपासणी शिबिर
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड १९च्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. डॉ. सोनाली केंद्रे यांनी सर्दी, ताप, खोकला यासह अन्य आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली. परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
-----------------
मानोरी रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावीदरम्यान असणाऱ्या मानोरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डयांचे साम्राज्य पसरले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनसुध्दा रस्त्याची डागडुजी केली जात नाही.