हॅण्डबॉल स्पर्धेसाठी सिन्नरच्या खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:35 PM2019-12-20T18:35:32+5:302019-12-20T18:36:12+5:30
महाराष्ट्र राज्य कृषी व अकृषी आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी सिन्नर महाविद्यालयाच्या खेळाडूंची (मुली) हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिन्नर : महाराष्ट्र राज्य कृषी व अकृषी आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी सिन्नर महाविद्यालयाच्या खेळाडूंची (मुली) हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेसाठी सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील खेळाडू अंकिता काकड, प्राजक्ता बोडके, कावेरी साठे, शुभांगी सालके यांची निवड झलेली आहे. या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोजी अहिरे, चिटणीस सुनील ढिकले, सिन्नर तालुका संचालक हेमंत नाना वाजे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, यांनी खेळाडूंचे कौतुक केले. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. एल. एस. कांदळकर, प्रा. पी. एम. खैरनार, प्रा. गोपाल अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.