सिन्नरला मतदारयाद्या पुनरीक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:51 PM2019-07-30T18:51:22+5:302019-07-30T18:52:16+5:30
मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन दिवसीय विशेष मोहीम सिन्नर विधानसभा मतदारसंघामार्फत असलेल्या सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात आली.
सिन्नर : मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन दिवसीय विशेष मोहीम सिन्नर विधानसभा मतदारसंघामार्फत असलेल्या सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात आली.
भारत निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणुक अधिकारी यांच्यामार्फत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा वंचित नागरिकांना नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी व त्यांचा मतदारयादीत समावेश करण्यासाठी मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्याचे घोषित केले होते.
सदर मोहिमेत वंचित व नवीन पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच नावात दुरुस्ती, वगळणी, स्थलांवर करून मतदार यादीचे अद्ययावतीकरण व सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. मतदारांनी आपले व कुटुंबीयांचे नाव मतनदार यादीमध्ये समाविष्ट आहे याची खात्री केली. मतदारयादीत नाव नसल्यास मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज ६ भरून संबंधित मतदान केंद्रांवर देण्यात यावा.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार राहुल कोताड यांच्यासह निवडणूक शाखेने परिश्रम घेतले.