सिन्नरचे उद्योजक खंडित वीजपुरवठ्याने संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:58 AM2018-10-10T00:58:59+5:302018-10-10T01:00:05+5:30

सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत खंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Sinnar's entrepreneurs suffer from disrupted power supply | सिन्नरचे उद्योजक खंडित वीजपुरवठ्याने संतप्त

सिन्नरचे उद्योजक खंडित वीजपुरवठ्याने संतप्त

googlenewsNext
ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप

सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत खंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रविवारी दुपारी १ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सिन्नर आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीत विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कोणत्याही पूर्वसूचनेविना अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने उद्योजकांचे अतोनात हाल झालेत. याबाबत सिन्नर निमा ऊर्जा समितीचे अध्यक्ष बबन वाजे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी व उद्योजकांनी तक्रार नोंदविण्यास महावितरण कार्यालयास संपर्क साधला असता कुणीही जबाबदार अधिकारी दखल घेण्यास तयार नव्हते. तब्बल सात ते आठ तास वीज गायब असल्याने शेकडो उद्योगांना उत्पादन बंद ठेवत नुकसान सोसावे लागले. आधीच मंदीचा सामना करत असलेल्या उद्योजकांमध्ये यामुळे तीव्र असंतोषाची भावना निमा व्यक्त करण्यात आली. आधीच राज्यातील वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने निमातर्फे विविध स्तरांवर पाठपुरावा केला जात आहे. त्यात भर म्हणजे असे प्रकार होत असल्यास ते उद्योगांच्या वाटचालीस मारक ठरणार असून, या बाबतीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ स्तरावर निमा पाठपुरावा करेल, अशी माहिती निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली.

Web Title: Sinnar's entrepreneurs suffer from disrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.