सिन्नरला किराणा दुकाने सहा तासच खुली राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:03+5:302021-04-20T04:15:03+5:30
येत्या ३० एप्रिलपर्यंत किराणा दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उघडी ठेवण्यात येतील, तर शुक्रवारी सुट्टी घेण्याचा ...
येत्या ३० एप्रिलपर्यंत किराणा दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उघडी ठेवण्यात येतील, तर शुक्रवारी सुट्टी घेण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. बहुसंख्य किराणा व्यापारी बांधवांनी या निर्णयाला आपली मान्यता दिली आहे. एखाद्या किराणा व्यावसायिकाने या निर्णयाचे पालन केले नाही तर ती त्याची जबाबदारी असेल. संघटना याला जबाबदार नाही. या गंभीर परिस्थितीत सगळ्यांनी एकत्रित भूमिका व निर्णय घेणे गरजेचे आहे. व्यापारी बांधव सुरक्षित राहिले पाहिजेत. रस्त्याने अनावश्यक गर्दी व्हायला नको. तसेच जनतेचीही गैरसोय व्हायला नको या सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष मनोज भंडारी यांनी सांगितले. त्याचे सर्वांनी पालन करावे व ग्राहकांनी बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी, असे सिन्नर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी कळविले आहे.