सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:40 PM2018-11-27T17:40:02+5:302018-11-27T17:40:29+5:30

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून परिसरातील पाळीव प्राण्यावर हल्ला करीत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

Sinnar's horror in the western strip | सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याची दहशत

सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याची दहशत

Next

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून परिसरातील पाळीव प्राण्यावर हल्ला करीत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
सोमवार पहाटे तालुक्यातील बेलू शिवारात घराजवळ बांधलेल्या पारडावर बिबट्याने हल्ला करुन त्याला फस्त केले. तर विंचूरदळवीत गोठ्यात बांधलेल्या कालवडीला गंभीर जखमी केल्याने बिबट्याची दहशत पसरली आहे. बेलू येथील आमराई मळ्यात राहणारे शिवाजी भगवंता तुपे यांच्या घराजवळ बांधलेल्या दोन वर्षांच्या पारडू बिबट्याने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हल्ला चढवून ठार केले. पारडीच्या गळ्यातील दोर न तुटल्याने व घरातील माणसे जागी झाल्याने बिबट्याने पारडू जागेवर ठेवून तेथून पळ काढला. मळ्यात काही दिवसांपूर्वी शिवराम दत्तू तुपे यांची वासरीही बिबट्याने भाताच्या शेतात ओढत नेऊन फस्त केली होती. विंचूरदळवीत रविवारी मध्यरात्री काशिनाथ दत्तू शेलार यांच्या गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला चढविला. जनावरांचा आवाज होताच शेलार हे बाहेर आले. ट्रॅक्टरची लाईट लावून त्यांनी सुदाम दळवी यांच्या मदतीने पडवीचे पत्रे वाजवून बिबट्याला पिटाळून लावत कालवडीची सुटका केली. पाढुर्ली येथील पशु पर्यवेक्षक डॉ. विश्वास वल्टे व डॉ. अनिल तुपे यांनी जखमी कालवडीवर उपचार केले. दरम्यान, बिबट्याच्या हल्यामुळे परिसर हादरून गेला आहे.

Web Title: Sinnar's horror in the western strip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ