सिन्नरचे खासगी डॉक्टर कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:39 PM2020-05-19T22:39:10+5:302020-05-20T00:04:44+5:30
सिन्नर येथील खासगी रु ग्णालयात प्रॅक्टिस करणारे ३३ वर्षीय डॉक्टर सिन्नर येथे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सिन्नर : येथील खासगी रु ग्णालयात प्रॅक्टिस करणारे ३३ वर्षीय डॉक्टर सिन्नर येथे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सिन्नरच्या आरोग्य विभागाने पाच वर्षीय बालिकेनंतर डॉक्टरांना कोरोनामुक्त केल्याने आरोग्य यंत्रणेचा विश्वास आणि उत्साह वाढला आहे. सिन्नर तालुक्यात गेल्या महिन्याभरात आठ कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी सहा रु ग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ८६ वर्षीय वृद्धासह पाच वर्षाची बालिकाही कोरोना लढ्यात यशस्वी ठरली आहे. सिन्नर आरोग्य विभागाने येथेच उपचार करून दोन
रु ग्णांना कोरोनामुक्त केले आहे. तीन दिवसांपूर्वी पाच वर्षीय बलिकेला डिस्चार्ज दिला होता. मंगळवारी खासगी रुग्णालयातील डॉक्टर कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देत होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला दिला.
१० रुग्णांना डिस्चार्ज
सिन्नर तालुक्यातील मूळ रहिवासी व मुंबई येथील बेस्ट ड्रायव्हर असलेले ३९ वर्षे रु ग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्या संपर्कातील हायलिस्टमधील आठ जण निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला, तर अन्य दोन संशयितही निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. या १० निगेटिव्ह रु ग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सिन्नरकरांना दिलासा मिळाला आहे.