सिन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:14 AM2021-02-12T04:14:11+5:302021-02-12T04:14:11+5:30

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर गावठाण परिसरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुदामाला गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. सार्वजनिक ...

Sinnar's Public Works Department warehouse fire | सिन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुदामाला आग

सिन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुदामाला आग

Next

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर गावठाण परिसरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुदामाला गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील बाजूला गुदाम असून त्यात आग लागल्याने काही काळ धावपळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसच्या मागे गोडावून आहे. दुपारी २ वाजता आग लागल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. अग्निशामक दलाच्या विभागाने सदर आग विझवली. गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने गुदामाचे पत्रे काढून धूर काढून देण्यात आला. त्यातून पाणी मारण्यात आले. या आगीत गोडावूनमधील जुनाट ३० ते ४० वर्षांपूर्वीचे दप्तर जळाले. गोडावूनमध्ये जुने भंगार, लोखंडी साहित्य होते. या आगीत केवळ दप्तर जळाले. तथापि, दप्तर ३० ते ४० वर्षांपूर्वीचे असल्याने कामात कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे उपअभियंता प्रवीण भोसले यांनी सांगितले.

----------------

वेल्डिंगच्या कामामुळे ठिणगी पडल्याची शक्यता

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोडावूनमध्ये दप्तर व भंगार होते. या गोडावूनच्या लोखंडी खिडक्या तुटून पडल्या होत्या. त्यातून भंगार सामानाची चोरी जाऊ नये म्हणून गोडावून दुरुस्ती व खिडक्या बसविण्याचे काम सुरू होते. खिडक्या लोखंडी असल्याने त्यांना वेल्डिंग करण्याचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या कामामुळे त्यात ठिणगी पडून दप्तराला आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यास उपअभियंता प्रवीण भोसले यांनी दुजारा दिला.

-------------

सिन्नर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोडावूनमध्ये आग लागून जळालेले दप्तर. (११ सिन्नर आग)

===Photopath===

110221\11nsk_30_11022021_13.jpg

===Caption===

११ सिन्नर आग

Web Title: Sinnar's Public Works Department warehouse fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.