सिन्नरला उमेदवारांपेक्षा ‘नेत्यांची’च प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: November 12, 2016 10:29 PM2016-11-12T22:29:46+5:302016-11-12T22:26:20+5:30

लक्षवेधी लढत : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत दुरंगीच होणार

Sinnar's reputation was better than the candidates | सिन्नरला उमेदवारांपेक्षा ‘नेत्यांची’च प्रतिष्ठा पणाला

सिन्नरला उमेदवारांपेक्षा ‘नेत्यांची’च प्रतिष्ठा पणाला

Next

 शैलेश कर्पे  सिन्नर
थेट नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे उमेदवार किरण डगळे व भाजपाचे अशोक मोरे यांच्यात रंगणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा आजी-माजी लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.
सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज छाननीनंतर पाच उमेदवार शिल्लक राहिले. त्यापैकी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक पंचरंगी होत असल्याचे कागदोपत्री दिसते. या निवडणुकीसाठी भाजपाचे अशोक रंगनाथ मोरे, शिवसेनेचे किरण विश्वनाथ डगळे, कॉँग्रेसच्या लता मनोहर हिले, मनसेचे राजेंद्र सुकदेव बोरसे व अपक्ष वसंतराव खंडेराव नाईक हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.
नगरपालिकेवर सध्या माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांची सत्ता आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी आमदार कोकाटे यांनी कंबर कसली आहे. कोकाटे कधी नव्हे एवढ्या उत्साहाने या निवडणुकीत कामाला लागल्याचे दिसते. तर सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्याचा चंग आमदार राजाभाऊ वाजे यांनी बांधला आहे. अनुसूचित जमातीसाठी नगराध्यक्षपद राखीव असल्याने वाजे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार देतांना त्याच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसते. निवडणुकीसाठी ४० हजार ५०० मतदार मतदान करणार आहेत. थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारात सिन्नरचे सुज्ञ व जागरुक मतदार वाजे किंवा कोकाटे यांची छबी पाहणार असल्याने उमेदवारापेक्षाच आजी-माजी लोकप्रतिनिधीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. गेल्या दोन थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर लोकांनी पक्षापेक्षा व्यक्तीलाच पसंती दिल्याचे दिसते. या दोन्ही निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाची धुरा सिन्नरकरांनी चांडक परिवाराकडे सोपवली होती.

Web Title: Sinnar's reputation was better than the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.