पंढरपूरला जाताना अपघातात सिन्नरच्या युवकाचा मृत्यू

By admin | Published: June 26, 2016 12:05 AM2016-06-26T00:05:32+5:302016-06-26T00:17:26+5:30

पंढरपूरला जाताना अपघातात सिन्नरच्या युवकाचा मृत्यू

Sinnar's youth death due to accident in Pandharpur | पंढरपूरला जाताना अपघातात सिन्नरच्या युवकाचा मृत्यू

पंढरपूरला जाताना अपघातात सिन्नरच्या युवकाचा मृत्यू

Next


सिन्नर : मित्रांसमवेत पंढरपूरकडे जात असताना जीप व ट्रक यांच्यात अपघात होऊन येथील गावठा भागात राहणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अहमदनगरजवळ घडली.
सिन्नर येथील मित्र परिवार मॅक्स जीपने पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे साडेतीन वाजता अहमदनगरच्या पुढे गेल्यानंतर मॅक्स जीप व ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात सुरज विष्णू झगडे (२८) याचा मृत्यू झाला, तर अनिल चव्हाणके, राहूल हांडोरे, दीपक काळे, गणेश लोणारे, शुभम गोळेसर, रामेश्वर मंडलिक (सर्व, रा. सिन्नर) हे जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत सुरज याच्या पार्थिवावर सिन्नर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Sinnar's youth death due to accident in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.