रेल्वेस्थानकावर सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:39 AM2017-08-31T00:39:34+5:302017-08-31T00:39:43+5:30
कसाºयानजीक आसनगावजवळ दुरांतो रेल्वेला झालेल्या अपघातामुळे दुसºया दिवशी बुधवारी मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ-दहा तासांहून अधिक उशिराने धावत होत्या.
नाशिकरोड : कसाºयानजीक आसनगावजवळ दुरांतो रेल्वेला झालेल्या अपघातामुळे दुसºया दिवशी बुधवारी मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ-दहा तासांहून अधिक उशिराने धावत होत्या. कसाºयाजवळील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ अतिवृष्टी व दरड कोसळल्याने मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रेल्वे रूळावरून घसरून मोठा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरल्याने रेल्वे रूळ व ओव्हरहेड वायरचे खांब उखडून गेले. यामुळे मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद पडली आहे. आसनगांव जवळ दुरांतोला झालेल्या अपघातामुळे मंगळवारी अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या रेल्वे मोठ्या उशिराने धावत होत्या. तर अनेक रेल्वे अर्ध्या मार्गावरून माघारी फिरविण्यात आल्या. अपघातानंतर मंगळवारी मुंबई व आजूबाजूच्या भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामात मोठा व्यत्यय निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत पावसाची सुरू असलेली संततधार कमी झाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाने वेग घेतला होता.
चोवीस तासांत केवळ एकच गाडी
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर २४ तासांत ६२ रेल्वे येतात व जातात; मात्र मंगळवारी दुपारी १२ वाजता इगतपुरी येथून माघारी बोलविलेली पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकरोडवरून मनमाडला रवाना झाल्यानंतर २४ तास बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकही रेल्वे नाशिकरोड मार्गे धावली नव्हती. बुधवारीदेखील दोन-चार रेल्वे येऊन गेल्या. यामुळे नाशिकरोड रेल्वे- स्थानकावर सर्वत्र शांतता पसरली होती. रेल्वे व प्रवासी येत-जात नसल्याने स्थानका बाहेरील रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डवरील गाड्यांची संख्या रोडावली होती.
नाशिककरांसाठी स्पेशल रेल्वे
रेल्वे प्रशासनाने नाशिककर व प्रवाशांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता मनमाड येथुन देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकापर्यंत शटलप्रमाणे स्पेशल रेल्वे सोडली होती. तीच स्पेशल ट्रेन देवळाली कॅम्प येथुन सायंकाळी ६ वाजता मनमाडच्या दिशेने रवाना झाली. तर मनमाड-इगतपुरी शटल आपल्या निर्धारित वेळेला धावली. तर औरंगाबादहुन सुटलेली जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड मार्गे नाशिकरोडपर्यंत येऊन पुन्हा त्याच मार्गे माघारी गेली. तसेच गोरखपुरहून मुंबईला जाणारी गोरखपुर एक्स्प्रेस सायंकाळी नाशिकरोडहुन पुन्हा माघारी मनमाड मार्गे गोरखपुरला रवाना झाली.