साहेब, तुम्ही कारखाना उभा कराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:05 AM2021-06-29T00:05:37+5:302021-06-29T00:06:25+5:30

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.

Sir, you must set up a factory! | साहेब, तुम्ही कारखाना उभा कराच !

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत उपस्थित इगतपुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी.

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आर्जव : इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्यासाठी महसूलमंत्र्यांना साकडे

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.
इगतपुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संगमनेर येथे महसूलमंत्री थोरात यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी तेथील भौगोलिक परिस्थिती चांगली असताना देखील इगतपुरी, त्रंबक येथील शेतकऱ्यांना भातशेतीवर अवलंबून राहावे लागते. भाताला गेल्या पाच वर्षांपासून शाश्वत भाव नाही, ऊस उत्पादनात हा तालुका अग्रेसर असून सन २०२० मध्ये इगतपुरीचे व नाशिकचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवडीखाली होते. परंतु हक्काचा कारखाना नसल्याने इतर ठिकाणी ऊस नोंद करण्यासाठी व पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हक्काचा कारखाना नाही. इगतपुरी तालुक्याला संगमनेरसारखे तुम्हीच उभे करू शकता, अशी भावनिक हाक थोरात यांना इगतपुरीतील शेतकऱ्यांनी आमदार सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत घातली.

इगतपुरी तालुक्यात सात ते आठ धरणे असून या धरणांमुळे तालुक्यातील व इतर तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे तर ते म्हणजे फक्त ऊस, तुम्ही जर इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना खासगी तत्त्वावर उभा केला तर नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबक तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतील. याप्रसंगी बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी गोरख भाऊ मराडे, सुनीलभाऊ वाजे, सुदाम भोसले, ज्ञानेश्वर जमदाडे, रामदास भोसले, निवृत्ती वाकचौरे, रमेश भोसले, समाधान शेलार, रमेश बेंडकोळी, सुनील गाढवे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

इगतपुरी तालुक्यातील धरणामुळे इतर तालुक्यांत देखील मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होऊ शकेल. हक्काचा नासाका असताना दोन हजार हेक्‍टर क्षेत्र ऊस लागवड केलेले होते. त्यात एकट्या इगतपुरी तालुक्यात हजार ते अकराशे हेक्टर, नाशिक तालुका सातशे ते आठशे हेक्टर, सिन्नर दोनशे ते अडीचशे व त्रंबक शंभर ते दीडशे क्षेत्रात लागवड होत होती. परंतु आज जर संगमनेरच्या धर्तीवर साखर कारखाना उभा राहिला तर या चारही तालुक्यांत मिळून चार हजार हेक्‍टरच्या आसपास ऊस लागवड होईल, अशी माहिती यावेळी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी केली.

Web Title: Sir, you must set up a factory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.