शहरात आजपासून सिरो टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:53+5:302021-01-09T04:11:53+5:30
दि. ९ ते ११ जानेवारी या तीन दिवसांत या सिरो टेस्ट करण्यात येणार आहेत. विविध भागातील विशिष्ट सँपल म्हणून ...
दि. ९ ते ११ जानेवारी या तीन दिवसांत या सिरो टेस्ट करण्यात येणार आहेत. विविध भागातील विशिष्ट सँपल म्हणून काही घरांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
शहरात ६ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला त्यानंतर मे, जूनपर्यंत रुग्णसंख्या मर्यादित हेाती. परंतु त्यानंतर मात्र शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. शहराच्याा विविध भागात दिवसाकाठी हजार ते बाराशे रुग्ण आढळत होते. मृत्युदरदेखील वाढला हाेता. नेाव्हेंबर महिन्यात तो नियंत्रणात आला असला तरी शासनाच्या आदेशानुसार आता हर्ड इम्युनिटी म्हणजेच सामूहिक प्रतिकार शक्ती तपासण्यासाठी सिरो टेस्ट करण्यात येणार आहे. त्याकरिता सॅम्पल टेस्टिंग करून किती टक्के नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झालेल्या आहेत यावरून निश्चित केले जाते. नाशिक शहरातील १५ लाख लोकसंख्येचा विचार करून सॅम्पल टेस्टिंगकरिता सुमारे अडीच हजार रक्त नमुने संकलित करण्यात येणार आहेत. शहरातील विविध भागातून अठरा वर्षांवरील विविध वयोगटाचे स्री व पुरुष अशा दोन्हींचे रक्त नमुने घेण्यात येणार आहे.
इन्फो...
या सर्वेक्षणात रक्त नमुने घेण्याकरिता काही घरांचीच निवड करण्यात आली आहे. त्यातीलही एकाच व्यक्तीचा रक्त नमुना घेण्यात येणार आहे. रक्त नमुना घेताना नागरिकाची संमतिपत्रावर स्वाक्षरीदेखील घेण्यात येणार आहे. संकलित केलेले रक्त नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवून अँटिबॉडी टेस्टिंग करण्यात येणार आहे. टेस्टिंगचा अहवाल परस्पर प्रयोगशाळास्तरावरून संबंधित लाभार्थी देण्यात येईल. या सर्वेक्षणासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. जगन्नाथ दीक्षित उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीस पथके कामकाज करणार आहेत.