ट्रकच्या धडकेत बहीण ठार, भाऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:01 AM2019-01-18T01:01:24+5:302019-01-18T01:02:23+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळील बळी मंदिर चौफुली जोड रस्त्यावरून ट्रक व दुचाकी सोबत वळण घेत असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालक ट्रकच्या चाकांखाली सापडला. यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Sister killed, brother injured | ट्रकच्या धडकेत बहीण ठार, भाऊ जखमी

ट्रकच्या धडकेत बहीण ठार, भाऊ जखमी

Next
ठळक मुद्देबळीमंदिर : हेल्मेटमुळे वाचले प्राण

पंचवटी/आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळील बळी मंदिर चौफुली जोड रस्त्यावरून ट्रक व दुचाकी सोबत वळण घेत असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालक ट्रकच्या चाकांखाली सापडला. यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना गुरुवारी (दि.१७) सकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आडगावच्या दिशेने प्रफुल्ल चंद्रशेखर खैरनार (२३) हे दुचाकीने (एमएच १५, जीएन २४३३) बहीण शुभांगी चंद्रशेखर खैरनार (१९, दोघे रा. विठाई, ता. साक्री) सोबत द्वारकेकडे जात होते. यावेळी महामार्गावरून द्वारके च्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच १५, ईजी ७४९९) बळी मंदिर चौफुलीवरून डावीकडे औरंगाबाद महामार्गाला जोडणाºया रिंगरोडवर वळण घेतले. दरम्यान, त्याचवेळी दुचाकीचालक खैरनार यांनीदेखील समांतर रस्त्यावर येण्यासाठी दुचाकी वळविली. यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने खैरनार यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून प्रफुल्ल खैरनार यांचे प्राण वाचले, मात्र दुर्दैवाने त्यांची बहीण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडली. या धडकेत प्रफु ल्ल यांनी परिधान केलेल्या हेल्मेटचा अक्षरश: चुरा झाला. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी जमली. तत्काळ जखमी प्रफुल्ल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. चौफुलीवर वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांचा मोठा लवाजमा होता; कारण संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा असल्याने महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहतूक पोलीस होते. तरीदेखील ट्रकचालकाने वळण घेताना निष्काळजीपणा दाखवून भरधाव वेगाने वाहन दामटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ही बाब पोलिसांच्या लक्षात आली नाही. परिणामी दुचाकीवरून जाणाºया भावाने बहिणीला गमावले असून, तोदेखील गंभीर जखमी झाला आहे.



आडगाव पोलिसांनी संशयित ट्रकचालक जगसलाल धनसर पाल (५१, रा. देवासनाका, इंदूर) याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sister killed, brother injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.