लसीकरणासाठी जायखेडा आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:06+5:302021-07-20T04:12:06+5:30
या पार्श्वभूमीवर उत्राने येथील सरपंच केदा पगार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक पगार, उपसरपंच पुंजाराम पगार, ग्रामस्थ मधुकर ...
या पार्श्वभूमीवर उत्राने येथील सरपंच केदा पगार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक पगार, उपसरपंच पुंजाराम पगार, ग्रामस्थ मधुकर पगार आदींनी जायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश रामोळे यांची भेट घेऊन तातडीने लसीकरण करण्याची मागणी केली. मात्र लसीचा पुरवठा पुरेसा व सुरळीत होत नसल्याने उत्राने येथे नेमके कोणत्या दिवशी लसीकरण करण्यात येईल हे सांगण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे संतप्त प्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच ठिय्या मारत लसीकरण कधी करणार या संदर्भात लेखी तारीख घोषित करण्याचा आग्रह धरला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामोळे यांनी १२० दिवसांच्या आत लसीकरण करण्यात येईन, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
फोटो- १९ जायखेडा आंदोलन
जायखेडा आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक पगार, सरपंच केदा पगार, उपसरपंच पुंजाराम पगार, मधुकर पगार आदी.
190721\19nsk_50_19072021_13.jpg
फोटो- १९ जायखेडा आंदोलन जायखेडा आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक पगार, सरपंच केदा पगार, उपसरपंच पुंजाराम पगार, मधुकर पगार आदी.