सिन्नर तालुक्यात ‘प्रहार’ चे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:14+5:302021-07-10T04:11:14+5:30
सिन्नर : गावाच्या विकासासाठी तलाठी, ग्रामसेवक यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ...
सिन्नर : गावाच्या विकासासाठी तलाठी, ग्रामसेवक यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, दिव्यांग व कार्यकर्त्यांनी शहा, वडांगळी व खडांगळी येथे ठिय्या आंदोलन व उपोषण केले.
तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. ही चळवळ तीव्र करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जागृती करीत तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. न्याय न मिळाल्यास मंत्रालयापुढे उपोषण करणार आहेत. मंत्री बच्चू कडू यांना भेटून शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांंना भेटणार असल्याचे तालुकाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.
तलाठी, ग्रामसेवक व सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी आदेश पाळून मुख्यालयी वास्तव्य करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दौलत धनगर, संदीप लोंढे, गीता पानसरे, पंकज पेटारे, बापू सानप, शोभा लांडगे, सुनील महाराज, संजय कदम, सोमनाथ महाराज, सुनील गर्जे आदी उपस्थित होते.
फोटो - ०९ प्रहार
शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहावे या मागणीसाठी शहा येथे ठिय्या आंदोलन करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते.
090721\09nsk_8_09072021_13.jpg
शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहावे या मागणीसाठी वडांगळी येथे ठिय्या आंदोलन करतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते.