निफाडला सहायक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:22 AM2022-02-05T00:22:17+5:302022-02-05T00:23:04+5:30
निफाड : तालुक्यात नवीन स्थापन झालेल्या सात संस्थांचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदार यादीत आल्याने सदर दुबार नावे तातडीने कमी करावी, या मागणीसाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसैनिकांसह निफाडच्या सहायक निबंधकांना घेराव घालत कार्यालयातच शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.
निफाड : तालुक्यात नवीन स्थापन झालेल्या सात संस्थांचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदार यादीत आल्याने सदर दुबार नावे तातडीने कमी करावी, या मागणीसाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसैनिकांसह निफाडच्या सहायक निबंधकांना घेराव घालत कार्यालयातच शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.
पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सहकारी सोसायटी निवडणुकांमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नवीन स्थापन झालेल्या सात विविध कार्यकारी सोसायटी संस्थांचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी संस्थेच्या मतदार यादीत आल्याने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. निफाड तालुक्यात नवीन स्थापन झालेल्या सात संस्थाचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदार यादीत आल्याने माजी सभापती पंडित आहेर, तालुकाप्रमुख सुधीर कराड, खंडू बोडके-पाटील यांनी हरकती घेऊनही निबंधक रणजीत पाटील यांनी याप्रश्नी निर्णय न दिल्याने सदर दुबार नावे तातडीने कमी करावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सहायक निबंधक रणजीत पाटील त्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशपत्राबाबत कार्यवाही न केल्याबद्दल माजी आमदार अनिल कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत सहायक निबंधक रणजीत पाटील यांना जाब विचारत फैलावर घेतले. तब्बल पाच तास शिवसैनिकांनी निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत निबंधक रणजीत पाटील यांना घेराव घातला. याबाबत रणजीत पाटील यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर घेराव आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
यावेळी विक्रम रंधवे, सुधीर कराड, गोकुळ गिते, सचिन वाघ, शरद नाठे, दादासाहेब बोरगुडे, बापू बोरगुडे, संजय बोरगुडे, मोहन जगताप, खंडू बोडके पाटील, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, दीपक कुशारे, छोटू साळे, अरुण डांगळे, भारत जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण जगताप, शंकर दौड, किरण दौंड, लक्ष्मण चकोर, संतोष टरले, ओम टरले, साईनाथ काळे उपस्थित होते.