ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:25 PM2020-08-28T22:25:57+5:302020-08-29T00:07:12+5:30
नांदगाव : तालुक्यातील वाखारी येथील हत्याकांडाच्या घटनेला बावीस दिवस उलटले असूनही पोलिसांच्या तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
नांदगाव : तालुक्यातील वाखारी येथील हत्याकांडाच्या घटनेला बावीस दिवस उलटले असूनही पोलिसांच्या तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. तपासाच्या नावाखाली मारहाण झाल्याचा आरोपही पोलिसांच्या उपस्थितीतच करण्यात आला. दरम्यान हत्याकांडाबाबत योग्य ती माहिती देणााºयास बक्षिसाची रक्कम एक लाख करण्यात आली. तपास अधिकारी समीरसिंग साळवे यांनी याअगोदरच्या पंचवीस हजाराऐवजी एकावन्न हजारांचे बक्षीस जाहीर केले होते, मात्र आमदार सुहास कांदे यांनी या बक्षिसाच्या रकमेत स्वत:चे पन्नास हजार रुपये दिल्याने आता माहिती देणाºयास एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी गावातील छत्रपती शिवाजी चौकात गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांची कुमुक बंदोबस्ताला मागविली होती संजय चव्हाण यांनी आंदोलांमागची भूमिका स्पष्ट केली पोलिसांच्या कार्यपद्धती विरोधात दादा कल्पना आहिरे ललिता शिंदे रमेश चव्हाण श्रावण देवरे किशोर चव्हाण मेघराज काकळीज भारत चव्हाण बाळू काकळीज यांची मनोगते यावेळी झालीत हत्याकांड होऊन बावीस दिवस झाले..अद्याप गावकरी दहशतीखाली वावरत आहेत. चौकशीच्या नावाखाली निरापराध गावक-यांना मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप गावकरी पोलीसांवर करत आहेत.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, समोर येऊन माहिती द्यावी. लवकरच आरोपी सापडेल जातील. सहकार्य करावे.
- समीरसिंग साळवे
उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड
हत्याकांडासारखा प्रकार घडल्यावरदेखील पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली नाही. ज्यांच्यावर तालुक्याची जबाबदारी असे तालुका दंडाधिकारी साधे ग्रामस्थांना भेटीला आले नाहीत. या प्रकारावरून यंत्रणेला किती गांभीर्य आहे, याची कल्पना यावी.
- संजय चव्हाण, नागरिक