तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:15+5:302021-09-16T04:19:15+5:30

कळवण : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील तांत्रिक अनुशेष अजूनही भरून निघालेला नसल्याने तो भरून काढण्यासाठी कळवण येथे शासकीय ...

Site inspection for Tantraniketan, College of Engineering | तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी जागेची पाहणी

तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी जागेची पाहणी

Next

कळवण : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील तांत्रिक अनुशेष अजूनही भरून निघालेला नसल्याने तो भरून काढण्यासाठी कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन सुरू करावे या आमदार नितीन पवार यांच्या मागणीला यश आले आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरातील जलसंपदा विभागाकडील व आयटीआय परिसरातील वसतिगृह, कर्मचारी निवास परिसरातील जागेची समिती सदस्यांनी पाहणी करून हिरवा कंदील दिला आहे.

तत्कालीन कळवणचे आमदार स्व.ए.टी. पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी या संदर्भात राज्यपाल, राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून मागणी केल्याने त्याची दखल घेऊन तंत्रनिकेतन विभागाचे सचिव डॉ. सुभाष महाजन यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन जागेची पाहणी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. तत्कालीन समितीच्या सदस्यांनी या संदर्भात तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांची भेट घेऊन जागेची मागणी केली असता ती त्यांनी धुडकावून लावल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. गेल्या पंचवार्षिकमध्ये ही मागणी मागे पडली. प्रलंबित असलेल्या या मागणीचा आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केल्याने पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाला दिले आहे.

या संदर्भात शासकीय समितीचे सदस्य जी.सी. खुरसाडे, एन. एल. पाटील, आर. एस. शुक्ल यांनी परिसरातील जागेची पाहणी करून मानूरचे तलाठी बच्छाव, जलसंपदा विभागाचे घोडे यांच्याकडून माहिती घेऊन पाहणी करून तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा योग्य असल्याचे सांगून वरिष्ठ कार्यालयात जागा निश्चितीचा अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. नाशिक विभागातील आदिवासी तालुक्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी ,उच्च व तंत्रशिक्षण उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने व आदिवासी भागाचा अनुशेष भरून निघण्यासाठी कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन सुरू करण्यास खास बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

---------------------

फोटो -तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी कोल्हापूर फाट्यावरील जागेची पाहणी करताना शासकीय समितीचे सदस्य जी.सी. खुरसाडे, एन.एल. पाटील, आर. एस. शुक्ल आदी. (१५ कळवण २)

150921\15nsk_8_15092021_13.jpg

१५ कळवण २

Web Title: Site inspection for Tantraniketan, College of Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.