शुद्ध पाण्यासाठी विहीरित खाटेवर बसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:27 PM2020-08-14T22:27:30+5:302020-08-15T00:25:50+5:30
ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत खाटेवर बसून शुक्र वार (दि१४) रोजी अनोख्या आंदोलनास सुरु वात केली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि. एस. मांडवडे यांनी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नांदगाव : तालुक्यातील ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत खाटेवर बसून शुक्र वार (दि१४) रोजी अनोख्या आंदोलनास सुरु वात केली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि. एस. मांडवडे यांनी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी येथील तांड्यातील महिला, पुरु ष आणि तरु णांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. सुर्यवंशी यांनी सांगितले, ढेकू खुर्द बुद्रुक आणि ढेकू तांडा येथे स्वतंत्र विहिरी असून त्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. परंतू तीनही ठिकाणी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना होण्यासाठी मागील वर्षात लाखो रु पये खर्च करण्यात आले होते.
काही दिवसांतच वरील योजना बंद पडली. त्यामुळे नागरिकांना व महिलांना दररोज स्वत: विहिरीवरु न पाणी न्यावे लागत आहे.सरपंच जोतीताई सुर्यवंशी यांनी सांगितले, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. आम्ही त्यासाठी विज वितरण कंपनीकडे तीनही विहिरीवर पाणी पुरवठा योजनेसाठी विज जोडणी मिळावी यासाठी मागणी केली आहे. विज जोडणी मिळाल्यानंतर तातडीने पाणी पुरवठा सुरळीत होईल असे ग्रामपंचायतच्या वतीने कळविले असल्याचे त्या म्हणाल्या.